एकदा गांधीजींना कशासाठी तरी लिंबाची पाने हवी होती. त्यांनी आश्रमातल्या एक तरुणाला सांगितले की, जा आणि लिंबाची दोन पानं तोडून आण. तो तरुण गेला आणि आश्रमाशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाची एक फांदीच तोडली. त्याने ती फांदी गांधीजींच्या समोर आणून ठेवली. गांधीजींनी ती फांदी पाहिली, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. गांधीजी म्हणाले,"आता या लिंबाचा वापर मी करू शकत नाही."
तरुणाला काही समजलं नाही. तो आश्चर्याने गांधीजींकडे पाहू लागला. गांधीजी म्हणाले,"मलाच जाऊन लिंबाची पाने आणायला हवी होती."
तरुणाने त्यांच्या दुःखी होण्याचे कारण विचारले, तेव्हा गांधीजी म्हणाले,"मी तुला फक्त लिंबाची दोन पाने आणायला सांगितली होती. तू तर पूर्ण फांदीच तोडून आणलीस. आता उरलेली पाने विनाकारण खराब होणार. मला याचेच वाईट वाटतंय."
त्या तरुणाच्या मनात अजूनही शंका होतीच. गांधीजी त्याला म्हणाले," आपण तेवढीच वस्तू घ्यावी, ज्याचा योग्य उपयोग आपण करू शकू. विनाकारण अधिक वस्तू घेऊन किंवा तिचा संग्रह करून ठेवण्याची पद्धत अनुचित आहे. यामुळे निसर्गाचेही नुकसान होते, जसे की आता झाले आहे. तरुण आता गांधीजींच्या दुःखाचे कारण समजले. गांधीजींना नैसर्गिक संसाधनेचे नुकसान केल्याने दुःख वाटत होते.
तात्पर्य- कोणतीही गोष्ट विनाकारण नाश करू नये.

No comments:
Post a Comment