एकदा गांधीजींना कशासाठी तरी लिंबाची पाने हवी होती. त्यांनी आश्रमातल्या एक तरुणाला सांगितले की, जा आणि लिंबाची दोन पानं तोडून आण. तो तरुण गेला आणि आश्रमाशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाची एक फांदीच तोडली. त्याने ती फांदी गांधीजींच्या समोर आणून ठेवली. गांधीजींनी ती फांदी पाहिली, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. गांधीजी म्हणाले,"आता या लिंबाचा वापर मी करू शकत नाही."
Monday, May 25, 2020
जमीन फाटली,पळा पळा
एका गावात एक माणूस झाडाखाली आराम करण्यासाठी आडवा झाला. वर झाडाकडे पाहात तो विचार करू लागला की, जमीन फाटली तर त्याचे काय होईल? तेवढ्यात जोरदार धमाक्याचा आवाज झाला. तो घाबरून ओरडू लागला, जमीन फाटली,पळा पळा. असे ओरडतच तो एका दिशेने पळू लागला. त्याला असे पळताना पाहून एकाने त्याला विचारले,'काय झाले?' तर तो धावत धावतच सांगू लागला,' जमीन फाटली आहे, जीव वाचव आणि तूही पळ.'
Sunday, May 24, 2020
मजुराच्या चपला
एकदा एक श्रीमंत माणूस आपल्या मुलासोबत पाय मोकळे करण्यासाठी फिरत निघाला होता. तेवढ्यात त्यांना वाटेत एक जोड जुनी चप्पल दिसली. ती जवळच्या शेतात काम करणाऱ्या कुणा एका मजुराच्या होत्या. मजूर काम संपवून घरी परतण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात मुलगा श्रीमंत बापाला म्हणाला,"बाबा, या चपला आपण लपवूयात. मजूर चपला शोधेल, तेव्हा खूप मजा येईल. तो श्रीमंत माणूस गंभीर होऊन म्हणाला,"कुणाची अशी चेष्टा करणे योग्य नाही. यापेक्षा आपण या चपलांमध्ये काही नाणी लपवून ठेवूयात. आणि मग त्या मजुरावर त्याचा काय परिणाम होतो ते पाहूया.
कोळीणचं जाळं
एका घरात एक कोळीण आपलं जाळं विणण्यासाठी जागा शोधत होती. खूप शोधाशोध केल्यावर तिने खोलीच्या एका कोपऱ्यातील जागा निवडली आणि तिथे जाळं विणायला सुरुवात केली. काही वेळानं तिनं पाहिलं की, एक मांजरीण तिच्याकडे पाहून हसत आहे. कोळीणनं विचारलं तेव्हा,मांजरीण म्हणाली की, ही जागा तर स्वच्छ, साफसफाई केलेली आहे. इथे ना माशा आहेत, ना डास. मग इथे तुझ्या जाळ्यात अडकेल कोण?'
तीन लाखाचा डाव
एकदा एका गावात कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानाला तीन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी खूप लांबून लांबून पैलवान आले आणि त्यांनी आपली ताकद दाखवली. त्या सगळ्या पैलवानांमध्ये एक असा पैलवान होता, ज्याला कुणीच हरवू शकले नाही. जेव्हा त्याने सगळ्या पैलवानांचा पराभव केला ,तेव्हा त्याने उपस्थित सर्व ग्रामस्थाना आव्हान दिले की, इथे असा कुणी 'माय का लाल' आहे का, जो माझ्यापुढे उभे राहण्याची हिम्मत करेल.'
पानाची ताकद
एका बागेत गुलाबाचे एक रोप होते. बागेत आलेला प्रत्येकजण गुलाबाच्या फुलांची प्रशंसा करत असे. अशात रोपामधल्या एका पानामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की, आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं तो उदास राहू लागला. एक दिवस खूप मोठं वादळ आलं आणि गुलाबाची सगळी फुलं तुटून पडली. ते उदास पानदेखील तुटून उडत उडत एका तलावात जाऊन पडलं. त्या तलावात एक मुंगी बुडत होती आणि जीव वाचवण्यासाठी धडपडत होती.
गरुड भरारी
एकदा एका राजाला गरुडाची दोन पिलं भेट स्वरूपात मिळाली. राजाने त्यांचा सांभाळ करण्यासाठी एका गड्याची नियुक्ती केली. काही दिवसांनी राजा ती दोन पिलं पाहायला गेला. ती दोन्ही पिलं आता मोठी झाली होती. त्यांचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केलेल्या माणसाला राजानं सांगितलं, की त्याला गरुडांना उडताना मला पाहायचं आहे. माणसाने गरुडांना आकाशाच्या दिशेनं उडवलं.
Saturday, May 23, 2020
राजाचे मित्र
राजा आदर्शसेनच्या राज्यात प्रजा खूप आनंदी आणि समाधानी होती. तिथे कधी कसला ताणतणाव नव्हता. ही गोष्ट शेजारच्या राज्याचा राजा कुशलसेनपर्यंत पोहचली. त्याच्या राज्यात नेहमीच भांडणतंटे होत होते आणि प्रजा दुखी होती. राजा कुशलसेन आपल्या शेजारी राज्यातील सुख-शांती आणि आनंद याचे रहस्य जाणून घेण्यासाठी आदर्शसेनकडे पोहचला आणि म्हणाला," माझ्या राज्यात तर सगळीकडे दुःख आणि आजार पसरला आहे. संपूर्ण राज्यात बेबंदशाही माजली आहे. कृपया, मला तुमच्या राज्यातील सुख-शांतीचे रहस्य सांगा. "
Friday, May 22, 2020
वाईटामुळे नुकसान
दोघे शेजारी होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. एक दिवस दोघांत कुठल्यातरी कारणावरून वाद झाले. दोघांची बोलचाल बंद झाली. पहिला शेजारी तसा विनम्र होता, पण दुसरा शेजारी मात्र त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता. त्याने या शेजाऱ्याविषयी लोकांना वाईट -साईट सांगू लागला. एक दिवस त्याला त्याच्या या वागण्यावर पश्चाताप झाला. तो एका साधूजवळ गेला आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला,'ती व्यक्ती वाईट नाही,पण मीच त्याच्याविषयी लोकांमध्ये वाईट-वंगाळ सांगितले आहे. आता पहिल्यासारखं चांगलं होईल का? मी काय करू?'
समर्पित कर्मचारी
एक तरुण होता.एक मोठी कंपनी त्याला आवडायची. या कंपनीत कसल्याही परिस्थितीत नोकरी मिळावी, हेच त्याचं ध्येय होतं. कंपनीची जागा सुटली. त्याच्या डिग्रीशी अनुरूप पदाला त्याने अर्ज केला. मुलाखतीच्या वेळेला मात्र त्याला त्याचं ट्रेनिंग योग्य झालं नसल्याचं सांगण्यात आलं. पण त्याला हेही सांगण्यात आलं की, या पदापेक्षा खालची जागा आहे, तिथे तू काम करतोस का बघ. त्याच्या शिक्षणाच्या तुलनेत ती जागा फारच कमी दर्जाची होती. तरीही त्याने लगेच होकार दिला.
मनासारखं काम
एकाच घरातील दोन मुलं नोकरी-व्यवसाय करण्याच्या वयाची झाली. तेव्हा दोघांनाही त्यांच्या मनासारखा कामधंदा करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यातल्या लहानग्या मुलाने असा व्यवसाय निवडला, ज्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. इकडे मोठ्या मुलाने मात्र आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मित्रांचे पाहून मोठा व्यवसाय निवडला. काही काळ गेला. दुसऱ्यांचे पाहून काम सुरू करणारा मोठा मुलगा आता तणावात राहू लागला.
Thursday, May 21, 2020
कोण आहे श्रेष्ठ?
एका संताकडे दोन विद्वान आले आणि स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगू लागले. त्यांनी संताला विनंती केली की, दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे,हे तुम्हीच सांगावे. संताने दोघांची परीक्षा घेतली,पण दोघे 'एकापेक्षा एक' निघाले. त्यांनाही कळेना,कुणाला श्रेष्ठ सांगावे. काहीतरी विचार करून संत म्हणाले, "आतापर्यंत दोघेही समान समान विद्वान आहात, असेच दिसते. परंतु तुम्हां दोघांपैकी कुणा एकाला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवता आले पाहिजे. त्यासाठी तुमची आणखी एक परीक्षा घेतली जाईल. यात जो उत्तीर्ण होईल, तो श्रेष्ठ असेल.'
विजयाचे रहस्य
एका दहा वर्षांच्या मुलाने त्याचा डावा हात एका कार दुर्घटनेत गमावला असतानाही जुडोचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जुडो गुरूने त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तीन महिन्यांपर्यंत त्याचे गुरू त्याला एकच डाव शिकवत राहिले. जेव्हा याबाबतीत त्याने गुरूला विचारले,तेव्हा ते म्हणाले की, तुझ्यासाठी हा एकच डाव पुष्कळ आहे. मुलाने गुरूवर विश्वास ठेवला आणि शिकत राहिला. काही दिवस उलटल्यानंतर गुरूने त्याला एका जुडो स्पर्धेत घेऊन गेले.
Wednesday, May 20, 2020
कष्टाची किंमत
एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याला एक मुलगा होता, राहुल. राहुलला वायफट खर्च करण्याची सवय लागली होती. त्याच्या वडिलांनी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. एक दिवस वडिलांनी त्याला सांगितले की, त्याने रोज 100 रुपये त्यांना आणून द्यायचे. राहुल तयार झाला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याला 100 रुपये मागितले. ऐकून राहुल चकित झाला,कारण वडील त्याच्याशी मस्करी करीत आहेत, असे त्याला वाटले होते. असो, शेवटी तो त्याच्या आजीकडे गेला, आणि तिच्याकडून 100 रुपये घेऊन वडिलांना दिले. वडिलांनी ती नोट फाडली. राहुलने विचारलं, 'तुम्ही असं का केलं'
इंजिन आणि हृदय
एक शहर होतं आणि या शहराच्या मुख्य बाजारात एक मोठं गॅरेज होतं. त्या गॅरेजचा मालक म्हटलं तर तसा भला माणूस होता,पण त्याच्यात एक कमतरता होती. तो आपल्या कामाला मोठं आणि दुसऱ्याच्या कामाला छोटं समजायचा. एक दिवस 'हार्ट सर्जन' त्याची गाडी दुरुस्त करायला त्याच्याकडे आला. बोलता बोलता गॅरेज मालकाला कळलं की, त्याचा हा कस्टमर एक हार्ट सर्जन आहे. तो सर्जनला म्हणाला की, आपल्या दोघांचं काम एकसारखंच आहे. यावर सर्जनने आश्चर्य होऊन विचारलं,'ते कसं काय?'
राजाचा आदर्श
कुठल्यातरी एका क्षुलक कारणावरून नाराज झालेल्या राजाने आपल्या पत्नीला घरातून हाकलून लावले. त्यांचे हे अहंकारी वागणे पाहून राजपुरोहितांना खूप वाईट वाटले. त्यांनी राज्याची साथसोबत सोडली. हळूहळू ही वार्ता नगरभर पसरली. लोक राजाविषयी काहीबाही बोलू लागले.ते म्हणू लागले की, जो राजा साध्या सरळ स्वभावाच्या आपल्याच माणसांचे रक्षण करू शकत नाही, तो प्रजेचे काय रक्षण करणार? लोक राजाज्ञाचे उल्लंघन करू लागले.या परिस्थितीचा फायदा घेऊन शेजारच्या राजाने राज्यावर आक्रमण केले.
आचरणात लपला स्वभाव
एका राजाला तीन पुत्र होते. त्यांच्या भविष्याबाबत तो चिंतीत होता. एक दिवस राजा आपल्या तिन्ही राजपुत्रांना सोबत घेऊन नगर भ्रमणासाठी निघाला. वाटेत एक महात्मा भेटला. राजाने त्यांना वंदन केले आणि आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचारले. महात्माने तिघांना प्रत्येकी दोन दोन केळी खायला दिली. एकाने केळी खाऊन साली रस्त्यावरच टाकून दिल्या. दुसऱ्याने केळी खाऊन त्याच्या साली कचरा कुंडीत टाकल्या. तिसऱ्या राजपुत्राने केळी खाऊन साली एका गायीला खायला दिल्या.
धावण्यातून शिकवण
एक दहा वर्षांचा मुलगा रोज आपल्या वडिलांसोबत डोंगरावर फिरायला जात असे. एक दिवस फिरताना मुलगा म्हणाला,"बाबा, आज आपण धावू या आणि जो पहिल्यांदा शिखरावर पोहोचेल, तो जिंकेल."
वडिलांनी गोष्ट मान्य केली आणि शर्यत सुरू झाली. काही अंतर गेल्यावर वडील धावायचे थांबले. यावर मुलाने विचारले,"आपण का थांबलात? तुम्ही हार मानली का?"
वडील म्हणाले,"चप्पलमध्ये खडा आलाय, म्हणून थांबलोय."
मुलगा म्हणाला," बाबा, माझ्याही चप्पलमध्ये खडे घुसलेत,
वडिलांनी गोष्ट मान्य केली आणि शर्यत सुरू झाली. काही अंतर गेल्यावर वडील धावायचे थांबले. यावर मुलाने विचारले,"आपण का थांबलात? तुम्ही हार मानली का?"
वडील म्हणाले,"चप्पलमध्ये खडा आलाय, म्हणून थांबलोय."
मुलगा म्हणाला," बाबा, माझ्याही चप्पलमध्ये खडे घुसलेत,
यशाचा धडा
एका तरुणाने खूप उत्साहात एका बिझनेसची सुरुवात केली होती. पण पाच-सहा महिन्यांतच एका मोठ्या तोट्यामुळे त्याला त्याचा बिझिनेस बंद करावा लागला. यानंतर तो उदास राहू लागला. बराच काळ उलटला तरी त्याने नवीन कुठलं काही काम सुरू केलं नव्हतं. ही गोष्ट त्या तरुणाच्या शिक्षकाला समजली. शिक्षकाने तरुणाला आपल्या घरी बोलावले. ते तरुणाला म्हणाले,'आयुष्यात हे सगळं होतंच राहतं, याच्याने निराश होऊन जायची काय गरज आहे?'
शिकण्याचं वय
स्वामी रामतीर्थ जपानच्या प्रवासावर होते. ज्या जहाजातून ते निघाले होते, त्यात नव्वद वर्षांचा एक वृद्ध पुस्तक उघडून चिनी भाषा शिकत होता. तो सारखं सारखं वाचत आणि लिहीत होता. स्वामीजींनी विचार केला की, हा वृद्ध या वयात चिनी भाषा शिकून काय करणार आहे? एक दिवस त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला विचारलंच,"माफ करा, पण तुमचं तर खूपच वय झालं आहे आणि शरीरानं जर्जरही झाला आहात. आणि या वयात ही कठीण भाषा कधीपर्यंत शिकणार आहात? आणि शिकलात तरी याचा वापर कधी आणि कसा करणार?"
Subscribe to:
Posts (Atom)



















