एका गावात एक माणूस झाडाखाली आराम करण्यासाठी आडवा झाला. वर झाडाकडे पाहात तो विचार करू लागला की, जमीन फाटली तर त्याचे काय होईल? तेवढ्यात जोरदार धमाक्याचा आवाज झाला. तो घाबरून ओरडू लागला, जमीन फाटली,पळा पळा. असे ओरडतच तो एका दिशेने पळू लागला. त्याला असे पळताना पाहून एकाने त्याला विचारले,'काय झाले?' तर तो धावत धावतच सांगू लागला,' जमीन फाटली आहे, जीव वाचव आणि तूही पळ.'
हे ऐकून तो माणूस देखील ओरडत पळू लागला. हळूहळू सगळा गावच एका दिशेने पळू लागला. गावात पसरलेल्या या गोंगाटाची माहिती गावच्या पंचाला समजली. तो त्या लोकांजवळ गेला आणि त्याने त्यांना थांबायला सांगितले.
मग त्याने विचारले, 'हा काय वेडेपणा आहे? तुम्ही सगळे कुठे पळू लागला आहात? '
गाववाल्यांनी जमीन फाटल्याची कहाणी सांगितली. यावर पंच म्हणाला,'हे तुम्हाला कुणी सांगितले?' सगळे एक- दुसऱ्याचे नाव सांगू लागले, शेवटी पहिला माणूस समोर आला. पंचाच्या सांगण्यावरून त्याने सगळ्यांना जिथे जमीन फाटल्याचा आवाज ऐकू आला होता, तिथे नेले. तिथे गेल्यावर कळलं की, तो आवाज जमीन फाटल्याचा नसून झाडावरून नारळ दगडावर पडल्याचा होता.
तात्पर्य- ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपले डोके चालवले पाहिजे.

No comments:
Post a Comment