एकदा एक श्रीमंत माणूस आपल्या मुलासोबत पाय मोकळे करण्यासाठी फिरत निघाला होता. तेवढ्यात त्यांना वाटेत एक जोड जुनी चप्पल दिसली. ती जवळच्या शेतात काम करणाऱ्या कुणा एका मजुराच्या होत्या. मजूर काम संपवून घरी परतण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात मुलगा श्रीमंत बापाला म्हणाला,"बाबा, या चपला आपण लपवूयात. मजूर चपला शोधेल, तेव्हा खूप मजा येईल. तो श्रीमंत माणूस गंभीर होऊन म्हणाला,"कुणाची अशी चेष्टा करणे योग्य नाही. यापेक्षा आपण या चपलांमध्ये काही नाणी लपवून ठेवूयात. आणि मग त्या मजुरावर त्याचा काय परिणाम होतो ते पाहूया.
मुलाने वडील म्हणतात तसेच केले. आणि दोघे म्हणजे बाप आणि मुलगा लपून बसले. काम संपल्यावर मजूर चपला घालू लागला,तेव्हा त्याच्या पायाला काहीतरी कठीण लागले. त्याने चपला उचलून उलट्या केल्या, तेव्हा त्यातून काही नाणी खाली पडली. मजुराने इकडे-तिकडे पाहिले,तेव्हा त्याला कुणीच दिसले नाही.मग त्याने ती नाणी उचलली आणि खिशात घातली आणि वर पहात म्हणाला,"देवा,ज्यांनी मला मदत केली आहे, त्या भल्या माणसाचे भले होऊ दे. आज त्याच्यामुळे माझ्या घरात चूल पेटणार आहे. त्या मजुराचे बोलणे ऐकून मुलाच्या डोळ्यांत पाणी आले. तो वडिलांना म्हणाला," खरंच बाबा, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद मोठा आहे."
तात्पर्य- एखाद्याला आनंद देण्याइतके दुसरे सुख नाही.

No comments:
Post a Comment