Wednesday, May 20, 2020

यशाचा धडा

एका तरुणाने खूप उत्साहात एका बिझनेसची सुरुवात केली होती. पण पाच-सहा महिन्यांतच एका मोठ्या तोट्यामुळे त्याला त्याचा बिझिनेस बंद करावा लागला. यानंतर तो उदास राहू लागला. बराच काळ उलटला तरी त्याने नवीन कुठलं काही काम सुरू केलं नव्हतं. ही गोष्ट त्या तरुणाच्या शिक्षकाला समजली. शिक्षकाने तरुणाला आपल्या घरी बोलावले. ते तरुणाला म्हणाले,'आयुष्यात हे सगळं होतंच राहतं, याच्याने निराश होऊन जायची काय गरज आहे?'

तरुण म्हणाला की, त्याने बिझिनेससाठी खूप मेहनत घेतली होती, मग तो अपयशी कसा होऊ शकतो? यावर शिक्षक त्याला घराच्या परसदारी घेऊन गेले. तिथे टोमॅटोचे सुकलेले रोप होते. शिक्षकांनी सांगितलं की, त्यांनी त्या रोपाला खत,पाणी सर्वकाही दिलं होतं. पण तरीही ते सुकलं. तू कितीही प्रयत्न केलास, तरी शेवटी काय होईल, ते तू ठरवू शकत नाहीस.'
तरुण म्हणाला, 'पुन्हा प्रयत्न करून काय फायदा?' यानंतर शिक्षक त्याला एका खोलीत घेऊन गेले. तरुणाने पाहिले की, तिथे टोमॅटोचा ढीग लागला आहे. शिक्षक म्हणाले,' टोमॅटोचे सगळी रोपे जळाली नव्हती.' त्यांनी तरुणाला समजावून सांगितलं की, तू जर सतत योग्य गोष्टी करत राहिलास तर यशाची संधीदेखील वाढत जाते. आणि मग तू यशस्वी नक्की होशील.
तात्पर्य:अपयशापुढे गुडघे टेकवण्यापेक्षा यशासाठी प्रयत्न करत राहा.

No comments:

Post a Comment