Friday, May 22, 2020

समर्पित कर्मचारी

एक तरुण होता.एक मोठी कंपनी त्याला आवडायची. या कंपनीत कसल्याही परिस्थितीत नोकरी मिळावी, हेच त्याचं ध्येय होतं. कंपनीची जागा सुटली. त्याच्या डिग्रीशी अनुरूप पदाला त्याने अर्ज केला. मुलाखतीच्या वेळेला मात्र त्याला त्याचं ट्रेनिंग योग्य झालं नसल्याचं सांगण्यात आलं. पण त्याला हेही सांगण्यात आलं की, या पदापेक्षा खालची जागा आहे, तिथे तू काम करतोस का बघ. त्याच्या शिक्षणाच्या तुलनेत ती जागा फारच कमी दर्जाची होती. तरीही  त्याने लगेच होकार दिला.

त्याला याच कंपनीत मोठ्या पदावर जायचं होतं. त्याचं स्वप्नच होतं ते! तो म्हणाला की, या कामाला सुरुवात आठवड्याने करीन चालेल का?
मुलाखतकारांनी त्याला परवानगी दिली. तो पुन्हा ज्यावेळेला कामावर आला तेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तू आठवड्याची सुट्टी का घेतलीस?
यावर तो तरुण म्हणाला की, माझी ज्या जागेसाठी निवड झाली आहे, त्याची मला काहीच माहिती नव्हती. आता त्याची चांगल्याप्रकारे माहिती घेऊन आणि शिकून आलो आहे. आता मला या जागेवर काम करायला काहीच अडचण येणार नाही. अधिकारी त्याची कामावरची निष्ठा पाहून चकित झाले.
तात्पर्य-कामाविषयी समर्पित भाव असावेत.

No comments:

Post a Comment