एक शहर होतं आणि या शहराच्या मुख्य बाजारात एक मोठं गॅरेज होतं. त्या गॅरेजचा मालक म्हटलं तर तसा भला माणूस होता,पण त्याच्यात एक कमतरता होती. तो आपल्या कामाला मोठं आणि दुसऱ्याच्या कामाला छोटं समजायचा. एक दिवस 'हार्ट सर्जन' त्याची गाडी दुरुस्त करायला त्याच्याकडे आला. बोलता बोलता गॅरेज मालकाला कळलं की, त्याचा हा कस्टमर एक हार्ट सर्जन आहे. तो सर्जनला म्हणाला की, आपल्या दोघांचं काम एकसारखंच आहे. यावर सर्जनने आश्चर्य होऊन विचारलं,'ते कसं काय?'
गॅरेज मालक म्हणाला,'हे इंजिन कारचे हृदय आहे. मी याला तपासतो, ते कसे चालले आहे पाहतो. मी त्याला खोलतो,व्हॉल्व फिट करतो, त्याला दुरुस्त करतो आणि पुन्हा जोडतो.हृदयसुद्धा माणसाचे इंजिनच आहे. म्हणजे तुम्ही देखील माझ्यासारखेच काम करता. काय बरोबर ना?'
सर्जनने होकारार्थी मान हलवली. गॅरेज मालक सर्जनला म्हणाला,'तुमचं काम माझ्यासारखेच असताना तुम्ही पैसे मात्र कितीतरी पटीने जास्त घेता. असे का?'
यावर सर्जन हसला आणि म्हणाला,'तू जे काम करतो आहेस ना ,ते इंजिन चालू असताना करून बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल.' गॅरेज मालकाकडे याचे उत्तर नव्हते. त्याला त्याची चूक लक्षात आली.
तात्पर्य: प्रत्येक कामाचे आपले एक महत्त्व असते. कोणतेही काम छोटे समजून नका.

No comments:
Post a Comment