स्वामी रामतीर्थ जपानच्या प्रवासावर होते. ज्या जहाजातून ते निघाले होते, त्यात नव्वद वर्षांचा एक वृद्ध पुस्तक उघडून चिनी भाषा शिकत होता. तो सारखं सारखं वाचत आणि लिहीत होता. स्वामीजींनी विचार केला की, हा वृद्ध या वयात चिनी भाषा शिकून काय करणार आहे? एक दिवस त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला विचारलंच,"माफ करा, पण तुमचं तर खूपच वय झालं आहे आणि शरीरानं जर्जरही झाला आहात. आणि या वयात ही कठीण भाषा कधीपर्यंत शिकणार आहात? आणि शिकलात तरी याचा वापर कधी आणि कसा करणार?"
हे ऐकून वृद्ध व्यक्तीने पहिल्यांदा तर स्वामीजींना अगदी निरखून पाहिलं. मग विचारलं," तुमचं वय किती?"
स्वामीजींनी सांगितलं,"तीस वर्षे!"
यावर वृद्ध हसला आणि म्हणाला," मला वाईट वाटतं की, या वयात तुम्ही प्रवासादरम्यान तुम्ही तुमचा किंमती वेळ वाया घालवता आहात. मी तुमच्यासारखा विचार करत नाही. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत शिकत राहीन. शिकण्याला कोणतं वय नसतं. मी असा विचार करणार नाही की, मी कधीपर्यंत जिवंत राहू शकेन, कारण मृत्यू वय पाहून येत नाही."
स्वामीजींनी क्षमा मागितली आणि म्हणाले,"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी जपानला काही शिकायला चाललो होतो, पण माझ्या आयुष्यात बहुमोल असा धडा तर तुम्ही वाटेतच , तोही एका क्षणात शिकवलात" वृद्ध काही न बोलता पुन्हा आपल्या वाचनात गढून गेला.
तात्पर्य: शिकण्याच्या इच्छेला वयाच्या बंधनात अडकवू नका.

No comments:
Post a Comment