Friday, May 22, 2020

मनासारखं काम

एकाच घरातील दोन मुलं नोकरी-व्यवसाय करण्याच्या वयाची झाली. तेव्हा दोघांनाही त्यांच्या मनासारखा कामधंदा करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यातल्या लहानग्या मुलाने असा व्यवसाय निवडला, ज्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. इकडे मोठ्या मुलाने मात्र आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मित्रांचे पाहून मोठा व्यवसाय निवडला. काही काळ गेला. दुसऱ्यांचे पाहून काम सुरू करणारा मोठा मुलगा आता तणावात राहू लागला.
एक दिवस त्याने आपली ही गोष्ट आपल्या धाकट्या भावाशी शेअर केली. धाकटा भाऊ म्हणाला,"दादा, ज्या कामाने आपल्याला आनंद मिळतो, यश त्यातच मिळते. मी माझं छोटं कामही आनंदानं करतो. त्यामुळेच मी यशस्वी आहे.तुम्हीही तुम्हाला आनंद वाटेल असे काम शोधा. मोठ्या भावाला धाकट्याचे म्हणणे पटले. त्याने लवकरच त्याच्या पसंदीचे वेगळे काम निवडले.
तात्पर्य: आपल्या आवडीच्या कामात आनंद मिळतो आणि यशही मिळते.

No comments:

Post a Comment