Wednesday, May 20, 2020

धावण्यातून शिकवण

एक दहा वर्षांचा मुलगा रोज आपल्या वडिलांसोबत डोंगरावर फिरायला जात असे. एक दिवस फिरताना मुलगा म्हणाला,"बाबा, आज आपण धावू या आणि जो पहिल्यांदा शिखरावर पोहोचेल, तो जिंकेल."
वडिलांनी गोष्ट मान्य केली आणि शर्यत सुरू झाली. काही अंतर गेल्यावर वडील धावायचे थांबले. यावर मुलाने विचारले,"आपण का थांबलात? तुम्ही हार मानली का?"
वडील म्हणाले,"चप्पलमध्ये खडा आलाय, म्हणून थांबलोय."
मुलगा म्हणाला," बाबा, माझ्याही चप्पलमध्ये खडे घुसलेत,
पण मला ते काढायला वेळ नाहीए." असे म्हणून तो पुढे गेला.  खडा काढून बाबा पुन्हा धावायला लागले. काही वेळानंतर मुलाच्या पायांत खडे टोचू लागले. त्याला फारच त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याचा वेग कमी झाला. हळूहळू त्याचे वडील त्याच्यापुढे निघून गेले. तेवढ्यात तो ओरडला, आता तो धावू शकणार नव्हता. बाबा लगेच त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याच्या चपला काढल्या तर त्याचे पाय रक्ताने माखले होते. वडिलांनी त्याला उचलून घरी आणले. त्याला मलमपट्टी केली. आणि त्याला समजावून सांगितलं, जर आयुष्यात एकादी समस्या आली तर ती वेळ नाही म्हणून टाळायची नाही. नाहीतर हीच समस्या पुढे जाऊन मोठी होते. आणि अपयशाला कारणीभूत ठरते.
तात्पर्य:समस्या आली तर तिचे त्याचवेळी निराकरण केले पाहिजे.

No comments:

Post a Comment