दोघे शेजारी होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. एक दिवस दोघांत कुठल्यातरी कारणावरून वाद झाले. दोघांची बोलचाल बंद झाली. पहिला शेजारी तसा विनम्र होता, पण दुसरा शेजारी मात्र त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता. त्याने या शेजाऱ्याविषयी लोकांना वाईट -साईट सांगू लागला. एक दिवस त्याला त्याच्या या वागण्यावर पश्चाताप झाला. तो एका साधूजवळ गेला आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला,'ती व्यक्ती वाईट नाही,पण मीच त्याच्याविषयी लोकांमध्ये वाईट-वंगाळ सांगितले आहे. आता पहिल्यासारखं चांगलं होईल का? मी काय करू?'
तेव्हा साधूने त्याला एक कागद दिला आणि सांगितले की, या कागदाचे तुकडे कर आणि जाताना थोडे थोडे टाकत जा. मात्र उद्या घरून येताना हेच कागद गोळा करून घेऊन ये.'
दुसऱ्या दिवशी तो शेजारी आला तेव्हा,त्याच्या हातात थोडेच तुकडे होते. तेव्हा साधू म्हणाला," अशा प्रकारे आपल्या तोंडून निघालेले शब्द पसरले जातात. ते आपल्याला परत वेचता येत नाहीत. आता तू भविष्यात पुन्हा असे न करण्याची शपथ घे. त्या माणसाने तसेच केले आणि आपल्या शेजाऱ्याची क्षमा मागितली.
तात्पर्य- दुसऱ्याविषयी वाईट बोलून आपली ऊर्जा नष्ट करू नका.

No comments:
Post a Comment