एका दहा वर्षांच्या मुलाने त्याचा डावा हात एका कार दुर्घटनेत गमावला असतानाही जुडोचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जुडो गुरूने त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तीन महिन्यांपर्यंत त्याचे गुरू त्याला एकच डाव शिकवत राहिले. जेव्हा याबाबतीत त्याने गुरूला विचारले,तेव्हा ते म्हणाले की, तुझ्यासाठी हा एकच डाव पुष्कळ आहे. मुलाने गुरूवर विश्वास ठेवला आणि शिकत राहिला. काही दिवस उलटल्यानंतर गुरूने त्याला एका जुडो स्पर्धेत घेऊन गेले.
तिथे तो सगळे सामने जिंकत फायनलला पोहचला. फायनल मॅच तशी कठीण होती,पण मुलाने फायनल मॅचमध्येही विजय मिळवला आणि स्पर्धा आपल्या नावावर केली. आपल्या विजयाने तोदेखील चकित झाला. त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. त्याला गुरूकडून आपल्या विजयाचे रहस्य जाणून घ्यायचं होतं. गुरूने सांगितलं की, त्याच्या विजयाची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे त्याने जुडोच्या सर्वात कठीण अशा डावांमधील एका डावामध्ये प्राविण्य मिळवले होते. दुसरे कारण म्हणजे त्या डावापासून बचाव करण्यासाठी समोरच्याला त्याचा डावा हात पकडणं गरजेचं होतं.
तात्पर्य-कमकुवतपणाची तक्रार करत बसण्यापेक्षा त्यालाच आपली ताकद बनवा.

No comments:
Post a Comment