एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याला एक मुलगा होता, राहुल. राहुलला वायफट खर्च करण्याची सवय लागली होती. त्याच्या वडिलांनी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. एक दिवस वडिलांनी त्याला सांगितले की, त्याने रोज 100 रुपये त्यांना आणून द्यायचे. राहुल तयार झाला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याला 100 रुपये मागितले. ऐकून राहुल चकित झाला,कारण वडील त्याच्याशी मस्करी करीत आहेत, असे त्याला वाटले होते. असो, शेवटी तो त्याच्या आजीकडे गेला, आणि तिच्याकडून 100 रुपये घेऊन वडिलांना दिले. वडिलांनी ती नोट फाडली. राहुलने विचारलं, 'तुम्ही असं का केलं'
वडील म्हणाले,'मी काय करतो हे विचारायचं नाही,तुझं त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. फक्त मला रोज 100 रुपये आणून द्यायचे.'
आता राहुल रोज कुणाकुणाकडून तरी 100 रुपये घेऊन वडिलांना आणून द्यायचा. वडील ते 100 रुपये घेऊन फाडायचे. हळूहळू सगळ्यांनीच राहुलला पैसे द्यायचे बंद केले.
एक दिवस राहुल असाच काळजीत बसला होता. आज वडिलांना 100 रुपये कोठून द्यायचे, याची त्याला विवंचना होती. तेवढ्यात त्याने पाहिले की, काही मजूर पोती उचलून गाड्यांमध्ये भरत आहेत. तोही पोती उचलू लागला. त्या मोबदल्यात त्याला 100 रुपये मिळाले. त्याने ते वडिलांना आणून दिले. पण वडील ती नोट फाडणार तोच त्याने त्यांना थांबवले आणि सगळी हकीकत सांगितली. वडिलांना काय म्हणायचं होतं, हे आता त्याला समजलं होतं.
तात्पर्य-कष्टाच्या कमाईची किंमत ओळखा आणि ती वायफट खर्च करू नका.

No comments:
Post a Comment