Wednesday, May 20, 2020

आचरणात लपला स्वभाव

एका राजाला तीन पुत्र होते. त्यांच्या भविष्याबाबत तो चिंतीत होता. एक दिवस राजा आपल्या तिन्ही राजपुत्रांना सोबत घेऊन नगर भ्रमणासाठी निघाला. वाटेत एक महात्मा भेटला. राजाने त्यांना वंदन केले आणि आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचारले. महात्माने तिघांना प्रत्येकी दोन दोन केळी खायला दिली. एकाने केळी खाऊन साली रस्त्यावरच टाकून दिल्या. दुसऱ्याने केळी खाऊन त्याच्या साली कचरा कुंडीत टाकल्या. तिसऱ्या राजपुत्राने केळी खाऊन साली एका गायीला खायला दिल्या.
महात्मा हे सगळे गंभीरपणे पाहात होता. तो राजाला एका बाजूला घेऊन सांगू लागला," तुमचा पहिला राजपुत्र मूर्ख आणि उद्धट आहे. दुसरा गुणी आणि समजूतदार आहे. आणि तिसरा सद्गुणी आणि उदार आहे. कदाचित तो उद्या एक चांगला समाजसेवक बनू शकेल. महात्माची ही गोष्ट ऐकून राजाने विचारले,"हे कोणते गणित घालून सांगता आहात मला?"
महात्मा म्हणाला," माणसाचे आचरण त्याचा स्वभाव सांगत असतो.आपल्या राजपुत्रांच्या आचारणावरून मी त्यांचे स्वभाव शोधले आहेत.
तात्पर्य: आपल्या आचारणावरून आपला खरा स्वभाव कळतो.

No comments:

Post a Comment