Wednesday, May 20, 2020

राजाचा आदर्श

कुठल्यातरी एका क्षुलक कारणावरून नाराज झालेल्या राजाने आपल्या पत्नीला घरातून हाकलून लावले. त्यांचे हे अहंकारी वागणे पाहून राजपुरोहितांना खूप वाईट वाटले. त्यांनी राज्याची साथसोबत  सोडली. हळूहळू ही वार्ता नगरभर पसरली. लोक राजाविषयी काहीबाही बोलू लागले.ते म्हणू लागले की, जो राजा साध्या सरळ स्वभावाच्या आपल्याच माणसांचे रक्षण करू शकत नाही, तो प्रजेचे काय रक्षण करणार? लोक राजाज्ञाचे उल्लंघन करू लागले.या परिस्थितीचा फायदा घेऊन शेजारच्या राजाने राज्यावर आक्रमण केले.
राजा सैन्य घेऊन शत्रूशी मुकाबला करण्यासाठी निघाला. वाटेत महर्षींचा आश्रम लागला. राजा त्यांना भेटण्यासाठी थांबला. पहिल्यांदा महर्षींनी राजाच्या अनुरूप स्वागत करण्याची तयारी चालवली,पण त्यांना समजले की, राजाने राणीला हाकलून लावले आहे, तेव्हा त्यांनी राजाचे सामान्य माणसाप्रमाणे स्वागत केले. राजाला ही गोष्ट आवडली नाही. राजाने याचे कारण विचारले. त्यावर महर्षी म्हणाले,"महाराज, पत्नीचा त्याग अधर्म आहे. राजा या नात्याने तुमचे गृहस्थी जीवनदेखील आदर्शवतच असले पाहिजे. पण तुम्ही असे केले नाही.
महर्षींचे बोलणे राजाला पटले. त्याने लगेच राणीला बोलावून आणण्याचा आदेश दिला. आणि आपल्या दूरवर्तनाबद्दल राणीची क्षमा मागितली.
तात्पर्य: दुसऱ्याशी चांगले वागा, मग लोक तुमच्या कार्याला महत्त्व देतील.

No comments:

Post a Comment