एका घरात एक कोळीण आपलं जाळं विणण्यासाठी जागा शोधत होती. खूप शोधाशोध केल्यावर तिने खोलीच्या एका कोपऱ्यातील जागा निवडली आणि तिथे जाळं विणायला सुरुवात केली. काही वेळानं तिनं पाहिलं की, एक मांजरीण तिच्याकडे पाहून हसत आहे. कोळीणनं विचारलं तेव्हा,मांजरीण म्हणाली की, ही जागा तर स्वच्छ, साफसफाई केलेली आहे. इथे ना माशा आहेत, ना डास. मग इथे तुझ्या जाळ्यात अडकेल कोण?'
मांजरीणचे म्हणणे तिला पटले. तिने अर्धेअधिक विणलेलं जाळं तसेच सोडून दुसरी जागा शोधू लागली. तिला खिडकीजवळची जागा योग्य वाटली. तिथे ती आपलं जाळं विणू लागली. तेवढ्यात तिथे एक चिमणी आली आणि कोळीणला म्हणाली,"इथं तर खिडकीतून जोरात वारा येत असतो, या वाऱ्यात तू आणि तुझं जाळं उडून जाल."
कोळीणला चिमणीची गोष्ट पटली. ती पुन्हा जाळं अर्धवट सोडून दुसरीकडे जाळं विणण्यासाठी जागा शोधू लागली. या सगळ्यात खूप उशीर झाला होता आणि तिला थकवाही आला होता. भूकही लागली होती. आता तिच्यात जाळं विणण्याची ताकद उरली नव्हती. ती अर्धमेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात बसून राहिली. आता तिला पश्चाताप होत होता. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण आपलं काम अर्धवटच सोडलं. नाहीतर आतापर्यंत ती आपल्या जाळ्यात आरामात बसली असती.
तात्पर्य- दुसऱयांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं काम अर्धवट सोडणं योग्य नाही.

No comments:
Post a Comment