युनानचे महान तत्त्वज्ञ होते सुकरात. त्यांची बायको खूपच भांडकूदळ होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती सुकरात यांच्याशी भांडत असे. पण प्रत्येक वेळी सुकरात शांत राहायचे. एके दिवशी सुकरात आपल्या काही शिष्यांसह घरी आले. कुठल्या तरी कारणाने त्यांची पत्नी त्यांच्यावर नाराज झाली. सुकरातनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे रागाने ती सुकरात यांना वाईट वंगाळ बोलू लागली. एवढं सगळं होऊनही सुकरात काहीच बोलले नाहीत. त्यामुळे आणखी चिढलेल्या पत्नीने बाहेरून चिखल आणून त्यांच्या अंगावर टाकला. तेव्हा सुकरात मोठमोठ्याने हसू लागले आणि म्हणाले,"तू एक जुनी म्हण खोटी ठरवलीस.'गर्जेल तो बरसेल कसा" या म्हणीचा अर्थ जो गरजतो तो बरसत नाही. पण तू मात्र गर्जतेसही आणि पडतेही."
सगळे शिष्य चाललेला सगळा घटनाक्रम पाहत होते.एका शिष्यानं सुकरात यांना विचारलं,"तुम्ही हे सगळं सहन कसं करता?"
सुकरात म्हणाले,"माझी पत्नी सर्वश्रेष्ठ आहे. ती तिच्या पद्धतीने बडवून पाहते की, सुकरात कच्चा आहे का पक्का. तिच्या या अशा वागण्याने मला कळतं की माझ्या अंगी सहनशीलता आहे की नाही. असे करून ती माझं भलंच करते आहे."
त्यांच्या पत्नीने हे शब्द ऐकले तेव्हा तिला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्या दिवसापासून पत्नीचा त्यांच्याशी वागण्याचा व्यवहार पूर्णपणे बदलला.
तात्पर्य:माणसाच्या अंगी सहनशीलता असावी.त्याचा फायदाच होतो.

No comments:
Post a Comment