एकदा एका गावात कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानाला तीन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी खूप लांबून लांबून पैलवान आले आणि त्यांनी आपली ताकद दाखवली. त्या सगळ्या पैलवानांमध्ये एक असा पैलवान होता, ज्याला कुणीच हरवू शकले नाही. जेव्हा त्याने सगळ्या पैलवानांचा पराभव केला ,तेव्हा त्याने उपस्थित सर्व ग्रामस्थाना आव्हान दिले की, इथे असा कुणी 'माय का लाल' आहे का, जो माझ्यापुढे उभे राहण्याची हिम्मत करेल.'
पैलवानाचे आव्हान ऐकून गर्दीतून एक हडकुळा माणूस बाहेर आला आणि रिंगणात येऊन उभा राहिला.
उपस्थित सगळे लोक चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. तो हडकुळा माणूस पैलवानाच्या कानाजवळ गेला आणि हळूच म्हणाला,"मी तुमच्यापुढे कुठे टिकणार आहे. तुम्ही एका झटक्यात मला चित कराल. पण जर तुम्ही कुस्ती हारली तर जिंकलेले तीन लाख तुम्हाला देईनच,वर माझ्याकडून आणखी तीन लाख रुपये देईन."
पैलवानाला पैशाची हाव सुटली. तो कुस्ती जाणूनबुजून हारला. दुसऱ्या दिवशी पैलवान पैसे मागायला गेला. तेव्हा तो हडकुळा माणूस म्हणाला,"ती तर मैदानातील गोष्ट होती. तिथे तू तुझा डाव लावला होतास आणि मी माझा!
हे ऐकून पैलवान मान खाली घालून माघारी परतला.
तात्पर्य- मेहनतीवर विश्वास ठेवा आणि नैतिक मूल्यांशी कधीच तडजोड करू नका.

खूपच मार्मिक
ReplyDeleteSunder gost ahe
ReplyDelete